सर्कलवाडी मध्ये आपले सहर्ष स्वागत …!

img-2सर्कलवाडी हे सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील पश्चिम सीमेलगत लगतचे एक छोटेसे गाव. राष्ट्रीय महामार्ग (NH-4) पासून वाई-वाठार मार्गवर् वसले आहे. राष्ट्रीय महामार्गालगत जोशीविहीर फाट्यामार्गे शिरगावघाट संपताच सर्कलवाडी हद्द सुरु होते.

गावची हद्द सुरु होताच रस्त्याच्या डावीकडे मुकाई देवीचे मंदीर आणि उजवीकडे रोडजाई देवीचे मंदीर आहे. थोडे पुढे जाताच डावीकडे एक पाझर तलाव आहे. तिथून काही अंतरापासून लोकवस्ती सुरु होते. साधारणता गाव हे वाई-वाठार मार्गाच्या दुतर्फा वसले आहे. गावची लोकसंख्या १३९७ इतकी आहे.

गावामधे जानुबाई मंदिर, लक्ष्मीआई मंदिर, श्रीराम मंदिर, विठठलरुख्माई मंदिर, काळूबाई, मुकाई आणि रोडजाई तसेच मारुती इत्यादी मंदिरे आहेत. गावामधे समाजमंदिरची ईमारत आहे. येथे ग्रामपंचातीचे सर्व कामकाज चालते. गावामधे अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणाची उत्तम सोय आहे. तसेच गावामधे व्यायामशाळा, वाचनालय सुध्दा आहे.

येथील ग्रामस्थानचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. गावामधे एकूण २ दूध डेअरी आहेत. शेतीविषयी विशेष सांगायचे तर गावातील बहुतांश शेतकरी आधुनिक शेती करतात. यामध्ये मुख्यता द्राक्षे शेती आणि स्ट्रॉबेरी शेती यामध्ये येथील शेतकरी अग्रेसर आहेत. खरे तर गावात पाण्याची विशेष अशी सुविधा नसून सुध्दा येथील शेतकरी पाण्याचे योग्य नियोजन करून शेतीमध्ये भरगोस उत्पन्न घेतात.

एकेकाळी गावतील नागरिकांला रोजगारासाठी गावा बाहेर जावे लागत असे. पण आता आधुनिक शेतीतंत्रामुळे गावतच रोजगार निर्मिती झाली आहे. अक्षरशा आता गावामधे बाहेरील गावातून कामगार मागवावे लागत आहेत. त्यामुळे त्या लोकानला सुध्दा रोजगार उपलब्ध झाला आहे. ही एक गावच्या द्रूस्टीने अभिमानाची गोष्ट् आहे.

गावचे आजून एक वैशिठ्य म्हणजे गावत तब्बल ५२ विविध अडनावे असलेली लोक रहतात. अश्या या गावत आम्ही राहतो म्हणून आम्हा सर्व नागरिकांला गावचा सार्थ अभिमान आहे.

भौगोलिक

भौगोलिक

गाव हे साधारणता ८३८.४०.१ हेक्टर शेत्रफलामधे विस्तारलेले आहे.

शैक्षणिक

शैक्षणिक

गावात अंगणवाडी ते इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण घेण्याची उत्तम सोय आहे.

सांस्कृतिक

सांस्कृतिक

गावात एक गाव एक गणपती हि संकल्पना फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.